कोल्हापूर : अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येबाबत सध्या जी चर्चा सुरू आहे, तेवढी चर्चा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर झाली असती तर सारे प्रश्न सुटले असते, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाला जो राजकीय रंग मिळाला आहे, जो वाद निर्माण झाला आहे त्यात आता शेट्टी यांनीही उडी घेतली आहे.
ते म्हणाले की, एक अभिनेत्याने केलेल्या आत्महत्येची केवढी चर्चा होते, रोज पोलिस नवनवीन माहिती देत आहेत, तपासाला रोज नवीन दिशा मिळत आहे, त्याच्याकडे असलेल्या कोटी कोटी रूपयांची चर्चा होत असताना शेतकरी मात्र रूपयाला महाग झाला आहे, त्याला एकेक रूपया म्हणजे गाडीचे चाक वाटत आहे.

No comments:
Post a Comment