गणेशोत्सवासाठी कोकणात स्पेशल ट्रेन; उद्यापासून 162 रेल्वे धावणार घोषणा - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, August 14, 2020

गणेशोत्सवासाठी कोकणात स्पेशल ट्रेन; उद्यापासून 162 रेल्वे धावणार घोषणा

 

मुंबई :  गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेच्या मार्गावर स्पेशल गाड्यांची घोषणा आज शुक्रवार रोजी करण्यात आली आहे. दि. 15 ऑगस्टला पहिली गाडी सुटणार असून 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत 162 गाड्या सुटणार आहेत. यात 81 अप तर 81 डाऊन गाड्यांचा समावेश असणार आहेख्‍ अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी माहिती दिली.


या सर्व रेल्वे गाड्या आरक्षित असणार आहेत. यासाठी 15 ऑगस्टपासून तिकिट बुकिंग सुरु होणार आहे. मध्ये रेल्वे कोकणातील गणेशोत्सवासाठी एकूण 162 ट्रेन सोडणार आहे. या सर्व ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटतील. या गाड्या सावंतवाडी रोड स्टेशन, कुडाळ स्टेशन आणि रत्नागिरी स्टेशनला जातील. मध्ये अनेक स्टेशनवर या गाड्या थांबणार आहेत. तर एलटीटी-कुडाळ-एलटीटी या गाडीच्या 16 फेऱ्या होणार आहेत. ही विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी निघेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता कुडाळ येथे पोहचेल. 


रेल्वे विभागाने या विशेष रेल्वे सुरु करत असतानाच प्रवाशांना कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी निश्चित केलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->