सांगली : माजी सामाजिक न्याय मंत्री तथा मिरज विधानसभेचे भाजपाचे आमदार सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आ. खाडे यांच्याबरोबर कुटुंबातील ८ सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मनपा उपायुक्तांनी दिली आहे. सुरेश खाडे यांच्यावर मिरज येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सांगली महापालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून रोज तपासणीनंतर दोनशेहून आधिक रुग्ण सापडत आहेत. आमदार खाडे यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती बुधवारी रात्री समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी विचारणा केली. रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या आमदार खाडे यांनी आपली प्रकृती उत्तम असून आपण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा संदेश दिला. तसेच कार्यकर्त्यांनी काळजी करुन नये मात्र सुरक्षेसाठी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment