औरंगाबाद : जिल्हयाचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची बदली करण्यात आली असून रिक्त जागेवर तुर्तास अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मंत्रालय उपसचिव पदावर बदली झाली आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पदभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून उपसचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश चौधरी यांना देण्यात आले आहेत. उदय चौधरी हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

No comments:
Post a Comment