पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण सुमारे 95 टक्के भरले आहे. तसेच खडकवासला धरणासह टेमघर, वरसगाव आणि पानशेत अशा चार धरणात मिळून 17.65 टीएमसी म्हणजे 60.54 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर खडकवासला धरण सुमारे 95 टक्के भरल्याने साठा नियंत्रित करण्यासाठी 1,103 क्युसेकने कॅनॉलद्वारे विसर्ग सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, भीमा खोऱ्यातील प्रमुख 24 धरणांपैकी 14 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे.
कासारसा धरणात 85.06, गुंजवणी-83.39, कळमोडी 81.67, आंद्रा-81.84, , खडकवासला-94.79, आणि वीर धरणात 86.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील धरणांमध्ये दि. 1 जूनपासून सर्वाधिक पाऊस हा टेमघर धरण क्षेत्रात झाला असून या ठिकाणी 1,496, मुळशी-1,454, वरसगाव-1,032, वडीवळे- 1,036, गुंजवणी-1,101, चासकमान-422, भामा-आसखेड परिसरात 409 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

No comments:
Post a Comment