विजयदुर्ग : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतेच स्वतः प्रत्यक्ष विजयदुर्ग किल्ल्यावर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. तसेच ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याची पडझड रोखण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली. याची तातडीचे दखल घेत ना. पटेल यांनी केंद्रीय पुरातत्व खात्याला दुरूस्ती खर्च तयार करण्याचे दिले आदेश दिले आहेत.
समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जमीन ओली होऊन मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. किल्लय़ामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास हा प्रकार बुधवारी सकाळी आल्यानंतर त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली.
पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. यावरूनच थेट दिल्ली गाठत गड-संवर्धनासाठी संभाजीराजेंनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत, मागणीचे निवेदन देऊन, परिस्थितीची माहिती दिली होती. यानंतर स्वतः संभाजीराजे हे विजयदुर्ग किल्ल्यावर प्रत्यक्ष पाहणी करण्यास पोहोचले. सांस्कृतिक व ऐतिहासिक वारस्याचे जतन करणे गरजेचे असून येणाऱ्या पिढ्यांसाठी गरजेचे असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

No comments:
Post a Comment