रत्नागिरी : आठ वर्षापूर्वी झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एकाने वृध्दाचा डोक्यात दगडी जाते घालून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी मधल कोंडगाव येथे आज पहाटे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकास पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सुभाष रामचंद्र काळोखे (73,कोंडगाव) असे मृत्यू झालेल्या वृध्दाच नाव आहे. तर भिकूजी पाटील (नाचणे रोड, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत देवरुख पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपी अभिजीत हा 2012 साली सुभाष यांच्या मुलीशी लग्न करण्याचा तगादा लावून होता. तो वारंवार त्रास देऊ लागल्याने सुभाष यांनी त्याला समजावून त्याच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यानंतर तातडीने त्यांनी आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्याशी लावून दिले. या गोष्टींचा राग मनात धरून अभिजीत याने सुभाष घरी एकटे राहत असल्याचा फायदा घेत 14 ऑगस्टला रात्री साडे दहाच्या सुमारास तिथेच असलेले एक दगडी जाते त्यांच्या डोक्यात घालत त्यांना ठार मारले व तो पसार झाला. काल मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला. याची खबर सुभाष यांचा मुलगा उदय याने पोलिसांना दिली.
पंचनामा करून संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर अधिक चौकशी करून पोलिसांनी अभिजीत याला अटक केली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरिक्षक तुषार पाचपुते अधिक तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment