नवी दिल्ली : केरळ आणि पश्चिम बंगाल मध्ये रार्ष्टीय तपासणी यंत्रणा (NIA) ने अल कायदाच्या 9 संशयित दहशतवाद्यांना अटक केले आहे. आज एनआयच्या टीमने अनेक ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे. मोठा घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.
एनआयएने सांगितले आहे की, राजधानी दिल्लीसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा, मोठा घातपात घडवण्याचा अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या कट होता. सुरुवातीच्या चौकशीनुसार अटक केलेल्या सर्वजणांना सोशल मीडियावरुन पाकिस्तान स्थित अल-कायदाच्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून द्वारा कट्टरपंथी बनवले होते. मात्र एनआयने कारवाई करत त्यांच्या हा कट उधळून लावला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व दहशतवादी हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अल-कायद्याशी संबंधित असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

No comments:
Post a Comment