उध्दव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटते - अनुराग कश्यप - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, September 20, 2020

उध्दव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटते - अनुराग कश्यप

 


मुंबई, दि. 20 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मतांशी मी सहमत नसेल ही, मात्र मला महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांच्यामुळे सुरक्षित वाटते, असे प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी एका मुलाखती दरम्यान म्हटले आहे. 


मुंबईची तुलना अभिनेत्री कंगना राणावतने पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून तिच्यावर अनेकांनी टीकास्त्र डागले आहे. तसेच त्यावर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील आपली भूमिका मांडली आहे. यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केले आहे. कश्यपनी म्हटले आहे की, कोणाचीही बाजू मी घेत नाही. पण महाराष्ट्रात मला खरच फार सुरक्षित वाटते. मी खुलेपणाने येथे माझे मत मांडू शकतो. ज्या गोष्टी गेल्या काही काळापासून घडत आहेत. त्या पाहून माझी शिवसेनेप्रती प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे हे घडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मतांशी मी सहमत नसेलही, पण मला महाराष्ट्रात कायम सुरक्षित वाटते, असे अनुराग कश्यपनी सांगितले 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->