मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे 'मातोश्री' निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, September 6, 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे 'मातोश्री' निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी

 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री' बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. दुबईहून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने याबाबतचा फोन केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्याचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं 'मातोश्री' उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. सदरील व्यक्ती दुबईवरून फोन करून धमकी देत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरून मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येतं आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->