मनसे आमदाराकडून प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी 5 लाखाची मदत - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 8, 2020

मनसे आमदाराकडून प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी 5 लाखाची मदत

 


डोंबिवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीत प्रतापगड या किल्ल्याचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे. कारण याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. त्यामुळे आजही लाखो-करोडो शिवभक्तांसाठी हा किल्ला एक प्रेरणास्थान आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माचीखालचा डोंगर खचला आहे. त्याच्याच दुरुस्तीचे काम हे सह्याद्री प्रतिष्ठानने हाती घेतले आहे. हे काम लोक वर्गणीमधून सुरू झाले असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या कामाला पाच लाख रुपयांची मदत केली आहे.


मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे गडकिल्ल्यांवरील प्रेम हे जगजाहीर आहे. गडकिल्ले वाचवले पाहिजेत आणि त्यांचे संवर्धन केले पाहिजे असे नेहमीच मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे सांगत असतात. त्यालाच अनुसरून प्रतापगडाच्या माची खालच्या डोंगर दुरुस्तीसाठी मनसे आमदार यांनी मदत केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->