मुंबई, दि. 03 : मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची पद्धत एक सारखीच असून एका जागेवरून थांबून ते यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहेत. मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत, ते पाळले जात असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे हा त्यांचा अधिकार असून कामाची व्याप्ती एका जागेवर बसून वाढवून काम करण्याची डिजिटल इंडियाची संकल्पना नरेंद्र मोदींचीच असल्याचे संजय राऊत म्हणाले.
राऊत राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत बोलताना म्हणाले की, सरकार बदलले की बदल्या करायच्या नाही, असे संविधानात लिहिले आहे का? यापूर्वीच्या किंवा केंद्राच्या सरकारमध्ये बदल्या झाल्या नव्हत्या का? असा सवाल त्यांनी केला.

No comments:
Post a Comment