'महाभकास' आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आलं नाही - चंद्रकांत पाटील - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 9, 2020

'महाभकास' आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आलं नाही - चंद्रकांत पाटील



मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने आज मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत आरक्षणाची अंमलबजावनी होऊ नये असा निर्णय न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारव टीका करत म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठा समाजाच्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे. महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. 


स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारने आरक्षण दिले. आरक्षण काही महिन्यांसाठी टिकलं पण नंतर स्थगिती मिळाली. आमच्या सरकारमध्ये कायमस्वरूपी मराठा आरक्षण टिकण्यासाठीचे प्रयत्न झाले. आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले. मात्र महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, असं चंद्रकांत पाटल यांनी म्हटले आहे. 


खंडपीठाकडे दिलेला विषय पूर्णच होत नाही त्यामुळे तात्पुर्ती स्थगिती नाही. आम्ही सरकारला सांगत होतो की जरा गांभीर्याने या प्रकरणाकडे लक्ष द्या. पण अशोक चव्हाण यांना ते काही जमलं नाही. सरकारने स्थगिती घेऊन स्वतःवर कुऱ्हाड मारून घेतली. दहा टक्के आर्थिक आरक्षण खंडपीठाकडे गेलं पण स्थगिती नाही, तामिळनाडूत आरक्षणाला स्थगिती नाही. मग आपल्या सरकारला हे का नाही जमलं? उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांपैकी कुणी या विषयाकडे लक्ष का दिले नाही? आम्ही स्वस्त बसणार नाही. या सरकारला आरक्षण टिकवता आले नाही हे करंटे आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->