अखेर संभाजी बिडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, September 9, 2020

अखेर संभाजी बिडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

 


पुणे, 08 : अखंड महाराष्ट्रासह देशाचे ऊर्जास्रोत असलेल्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने गेल्या अनेक दशकापासून बिडी विकणा-या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरुषांचा अवमान केल्याची शिवधर्म फाउंडेशनने तक्रार दाखल केली होती. या संघटनेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संभाजी बिडीचे उत्पादन करणाऱ्या पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक साबळे-वाघिरे ग्रुपवर अखेर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने बिडीचे उत्पादन करणाऱ्या या कंपनीच्या विरोधात शिवभक्तांनी राज्यभरात आंदोलन पुकारले होते. अखेर त्यांच्या या आंदोलनाला आज यश मिळाले आहे.

 गेली कित्येक दशके महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बिडी विकली जात आहे. या बिडीच्या पॅकेटवर महाराजांचे फोटो देखील होता. बिडीच्या उद्योजकांविरोधात याआधी देखील शिवभक्तांकडून आवाज उठवला जात होता.  शिवभक्तांनी आक्रमक भूमिका घेवून समाजमाध्यमातून या विरोधात आवाज उठवला. अखेर संभाजी महाराजांच्या नावाने व्यसनी पदार्थ विकणे उद्योजकांना भोवले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->