औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दोन दिवसापूर्वी अंतरम स्थगिती देत यासंबंधीची याचिका पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाकडे वर्ग केला. मात्र, आता पुन्हा मराठा संघटनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करुन अंतरिम स्थगिती उठविण्याची विनंती केली आहे.
मराठा संघटनेच्या वतीने केलेल्या अॅड. संदीप देशमुख यांनी यांच्यावतीने अर्ज दाखल करण्यात आला आहे. यात सर न्यायाधीशांना विनंती केलेली आहे.इंद्रा सावनी खटल्यामध्ये मागासवर्गीय आरक्षणाबाबत आहे. मराठा आरक्षण हे सामाजिकरित्या, शैक्षणिक मागास हा नवीन प्रवर्ग करून आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे या न्यायालयाला स्थगिती देता येत नाही. तसंच या न्यायालयाने प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे वर्ग केलेले आहे त्यांना सुनावणी घेण्याचा अधिकार नाही तर स्थगिती देणे योग्य नाही, असे अर्जात म्हटले आहे.
सदर अर्ज हा प्रकरण जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री, महाराष्ट्र मुख्य सचिव व विनोद नारायण पाटील यामध्ये करण्यात आलेला आहे.

No comments:
Post a Comment