अखेर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 8, 2020

अखेर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

 


मुंबई : अंमलीपदार्थ प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला आज मंगळवार रोजी अटक करण्यात आली आहे.  अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून (एनसीबी) ही कारवाई करण्यात आली आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ही मोठी कारवाई आहे. सुशांतचा नोकर दीपेशच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते.


याबाबत मिळालेली अशी की, रिया चक्रवर्ती चौकशीसाठी हजर झाल्यानंतर याप्रकरणात याअगोदर अटकेत असलेले रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतच्या हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा व सुशांतच्या घरात काम करणारा दीपेश सावंत यासर्वांना एकमेकांसमोर आणणार असल्याचं म्हंटल होत. यामुळे अंमलीपदार्थ साखळीत कोणी काय भूमिका बजावली हे समजून घेणे सोपे होईल असेही एनसीबीयाकडून सांगण्यात आले होते.


दरम्यान, एनसीबीने सुशांत मृत्य प्रकरणाशी संबंधित असलेल्या अंमलीपदार्थ प्रकरणात आतापर्यंत आठ जणांनाअटक केली आहे.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->