पूर्ण प्रवासी क्षमतेने धावण्यास एसटीला राज्य सरकारची परवानगी - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, September 17, 2020

पूर्ण प्रवासी क्षमतेने धावण्यास एसटीला राज्य सरकारची परवानगी

 


मुंबई : कर्नाटक व गुजरातमध्ये १०० टक्के प्रवासी वाहतूक सुरु केल्याच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून पूर्ण आसनक्षमतेने करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.


२० जुलैला सोशल डिस्टन्सिंग पाळत आसन क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. एसटी महामंडळाने राज्य शासनाकडे पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार राज्य शासनाने प्रत्येक प्रवासी व कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान मास्क लावणे व निर्जंतुक करणे या अटीवर बसेसच्या पुर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्यापासून सर्व एसटी बसेस पुर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करणार आहेत.


जाणून घ्या अटी :

– बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणं बंधनकारक

– वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात याव्यात

– लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. तथापी पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरु होत असल्याने सर्व आसने पूर्वीप्रणाणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन द्यावीत.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->