डिमॅट खात्यांची संख्या वाढली; खात्यांची संख्या अडीच कोटी वर - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, September 7, 2020

डिमॅट खात्यांची संख्या वाढली; खात्यांची संख्या अडीच कोटी वर

 


नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच ग्राहकांनी डिमॅट खाते काढून त्याद्वारा शेअरचे व्यवहार केले असल्याचे दिसून येते. शेअरची डिपॉझिटरी असलेल्या सीडीएसएलकडील सक्रिय डिमॅट (डिमटेरिआलाईज्ड) खात्यांची संख्या अडीच कोटी वर गेली आहे. 


सीडीएसएसएल म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेसने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, 1999 पासून 2015 पर्यंत डिमॅट खात्याची संख्या 1 कोटी झाली. त्यानंतर या वर्षाच्या जानेवारीपर्यंत डिमॅट खात्याची संख्या 2 कोटी झाली.


तर जानेवारीपासून 31 ऑगस्टपर्यंत 50 लाख लोकांनी डिमॅट खाते उघडले. गेल्या पाच वर्षात दीड कोटी डिमॅट खाती उघडली आहेत. लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना या खात्याच्या माध्यमातून व्यवहार करता येणे शक्‍य असल्याचे माहीत झाले, असे सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक नेहल व्होरा यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->