रेडणी येथील फुटलेल्या पाझर तलावाचा पंचनामा करुन दुरुस्ती करण्याची मागणी - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, November 5, 2020

रेडणी येथील फुटलेल्या पाझर तलावाचा पंचनामा करुन दुरुस्ती करण्याची मागणी

  


रेडा, दि. ५ : शेतीच्या पंचनामे प्रमाणे रेडणी ता. इंदापूर येथील फुटलेल्या पाझर तलावाचा पंचनामा करून तात्काळ दुरूस्ती करण्याची मागणी रेडणी गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल चव्हाण व सचिन तरंगे यांनी पुणे जिल्हा परिषद छोटे पाटबंधारे विभागाला केली असल्याची माहिती बोलताना दिली. 

यावेळी रेडणी गावतील ग्रामपंचायत सदस्य चव्हाण व तरंगे पुढे म्हणाले की, रेडणी गावचा पाझर तलाव हा गेली ३५ वर्षे गावातील शेतकरी याना एक वरदान लाभलेला आहे. दर वर्षी पावसाळ्यात पाझर तलाव पुर्ण क्षमतेने भरला जातो. या पाझर तलावामुळे रेडणी परिसरातील एक ते दीड किमी अंतरावरील शेतातील विहिरींना परकुलेशनद्वारे सुमारे उन्हाळ्यातील फेब्रुवारी ते मार्च पर्यंत शेती सिंचनाचा प्रश्न सुटलेला असतो .

चालू वर्षाच्या पावसाळ्यात गेल्या १४ व १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ओढ्याला नदीचे रूप धारण झाले. त्यामुळे जोरदार पावसामुळे आणि अतिपाण्याच्या वेगाने रेडणी गावासाठी वरदान ठरलेला पाझर तलाव वाहून गेला. यामुळे पाझर तलावावरील प्रकूलेशनवर अवलंबून असलेल्या शेतकरी यांचे चालू वर्षी उन्हाळ्यातील नगदी पिके हातून जाणार आहेत.

यासाठी राज्यमंत्री दत्ताञय भरणे यांनी पुणे जिल्हा परिषद छोटे पाटबंधारे विभागाला तात्काळ आदेश देऊन पाझर तलावाची दुरूस्ती करून पाणी साठवण्यासाठी संबंधित आधिकारी याना चनामे करण्यासाठी आदेश करावेत, असेही शेवटी ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल चव्हाण व सचिन तरंगे यांनी बोलताना सांगितले. 

फोटो ओळ :- ऑक्टोबरच्या अतिवृष्टीत रेडणी येथील पाण्याच्या वेगात फुटलेला पाझर तलाव  (छाया : संतोष भोसले, रेडा)

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->