दहा लाखांची लाच घेताना इन्कम टॅक्स अधिका-याला रंगेहाथ पकडले - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 18, 2020

दहा लाखांची लाच घेताना इन्कम टॅक्स अधिका-याला रंगेहाथ पकडले

 



कोल्हापूर, दि. 18 : कोल्हापुरातील इन्कम टॅक्स अधिका-याला एका डॉक्टरकडून छापा न टाकण्यासाठी सुमारे दहा लाखांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शुक्रवार दि. 18 डिसेंबर रोजी लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन पुलावर करण्यात आली.


प्रताप महादेव चव्हाण (रा. सी बोर्ड कोल्हापूर) असे इन्कम टॅक्स अधिका-याचे नाव आहे. करवीर तालुक्यातील एका डॉक्टर विरोधात अज्ञात व्यक्तीने इन्कम टॅक्स विभागाकडे तक्रारी अर्ज दिला होता. त्यावरुन इन्कम टॅक्स विभागाकडून त्या डॉक्टराची चौकशी सुरु होती. या चौकशी दरम्यान निरीक्षक चव्हाण यांना छापा टाकण्याचा इशारा दिला होता. संबंधित डॉक्टरने छापा टाकू नये यासाठी चव्हाण यांना विनंती केल्यानंतर त्यांनी 25 लाखेची मागणी केली. नंतर ही तडजोड 14 लाखांवर ठरली होती. ठरलेल्या रक्कमेपैकी दहा लाख रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले. त्याप्रमाणे ही रक्कम स्वीकारताना चव्हाण याना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->