माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 4, 2021

माजी मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचे निधन

 


सातारा,‍ दि. 04 : माजी सहकार मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी आज पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. गेल्या एक महिन्यापासून साताऱ्यातील डायलिसिस सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर कराड तालुक्यातील उंडाळे या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


विलासकाका पाटील उंडाळकर यांचा जन्म 15 जुलै 1938 रोजी झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण उंडाळे गावात तर माध्यमिक शिक्षण कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले. विलासकाकांनी १९६२ मध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी सलग ३५ वर्षे प्रतिनिधित्व केले असुन पुरोगामी विचारांचे व काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख होती. तब्बल १२ वर्षे मंत्री म्हणून त्यांनी वेगवेगळ्या खात्यांची धुरा सांभाळली होती. 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->