अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात घेणार - ना. उदय सामंत - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, August 31, 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडयात घेणार - ना. उदय सामंत

 


मुंबई, दि. 31 : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने हालचाल सुरु केली असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 


यावेळी पुढे बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत युजीसीकडे मुदतवाढ मागावी यासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंनी मागणी केली आहे. ही मागणी युजीसीने मान्य करावी यासाठी सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक व्हावी आणि मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवावा आणि तशी विनंती यूजीसीकडे करावी अशी सूचना कऱण्यात आली आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली जाईल. त्यानंतर कुलगुरुंनी केलेल्या विनंतीप्रमाणे मुदतवाढ मिळावी यासाठी यूजीसीकडे विनंती करणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी यावेळी दिली.


विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूर्ण सप्टेंबर महिना वेळ दिला जाईल व त्यानतर रीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल. निकाल काही विद्यापीठ ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर करतील. तर काही विद्यापीठ १० नोव्हेंबरपर्यंत जाहीर करतील. तसेच घराबाहेर पडून केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही, यासंबंधी कुलगुरुंकडे विनंती करण्यात आली असून त्यावरही चर्चा झाली. शारिरीक आणि मानसिक त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे, अशी पुन्हा विनंती कऱण्यात आली. त्यानुसार पेडणेकर समिती चांगल्या पद्धतीने काम करत असून कार्यवाही करत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->