कोल्हापूर : विना मास्क 139 जणांना कुरुंदवाड नगरपरिषदेकडून 14 हजाराचा दंड - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 8, 2020

कोल्हापूर : विना मास्क 139 जणांना कुरुंदवाड नगरपरिषदेकडून 14 हजाराचा दंड

  


कोल्हापूर : जिल्ह्यातील कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 139 जणांकडून 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.


 कुरुंदवाड नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करुन विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरु केली आहे. आजअखेर 941 जणांकडून 94 हजार 200 रुपये दंडाची वसुली केली आहे.


   जयसिंपूर नगरपरिषदेमार्फत 39 विना मास्क व्यक्तींकडून आजच्या दिवशी 3 हजार 900 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आज अखेर विना मास्क 1065 व्यक्तींकडून 1 लाख 9 हजार 780 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 32 जणांकडून 7 हजार 40, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या 50 जणांकडून 8 हजार रुपये, मास्क व ग्लोज न वापरणाऱ्या 14 दुकानदारांकडून 2 हजार रुपये, मास्क, ग्लोज न वापरणाऱ्या 212 फिरते फळ भाजी विक्रेत्याकडून 30 हजार 880 तर विहित केलेल्या वेळेनंतरही आस्थापना सुरु ठेवणाऱ्या 36 जणांकडून 32 हजार 400 रुपये दंडाची वसुली केली आहे.


चंदगडनगर पंचायतीकडून विना मास्क फिरणाऱ्या 15 नागरिकांकडून 2 हजार 500 रुपये दंड वसूल केला आहे.


गडहिंग्लज नगरपरिषदे कडून आज विना मास्क फिरणाऱ्या 14 नागरिकांकडून 1 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे. आज पर्यंत 1809 नागरिकांकडून 2 लाख 66 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे.


मलकापूर नगरपरिषदे कडून आज विना मास्क फिरणाऱ्या 36 नागरिकांकडून 3 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->