सातारा : कासवाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक - Mahabatmi - Latest News From All Over Maharashtra

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 8, 2020

सातारा : कासवाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

 


सातारा : अतिशय दुर्मिळ जातीच्या कासवाची तस्कर करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने वाठार किरोली (ता. कोरेगाव) या ठिकाणाहून अटक केली आहे. सदरील कासवांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


प्रकाश अधिकराव चव्हाण (रा. वाठार किरोली), सतीश भगवान साळवे (रा.वाठार, ता. कोरेगाव) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.  कासवाची स्टार ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ असून हे कासव घरात ठेवल्यास घरात अथवा नोकरी धंद्यात बरकत होते, अशी अंधश्रद्धा आहे. यामुळे या कासवांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. त्यामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वाठार किरोली येथील दोन व्यक्तींकडे या प्रजातीचे कासवे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार वाठार किरोली परिसरात त्यांच्या अटकेसाठी एलसीबीच्या पथकाने सापळा रचला होता.


वाठार किरोली येथील बेघर वस्ती परिसरात संशयित आल्यानंतर त्यांच्याकडील पिशवीची झडती घेतली असता पोलिसांना कासव आढळून आले. पोलिसांनी संशयिताकडे अधिक चौकशी केली असता ते कासव विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पुढील कारवाईसाठी संशयितांना वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.


सदरील कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतिराम बर्गे, हवालदार राजकुमार ननावरे, विनोद गायकवाड, योगेश पोळ, नितीन भोसले, मयूर देशमुख, प्रवीण कडव यांनी केली.


No comments:

Post a Comment

Post Top Ad

-->